जि.प.चंद्रपूर उक्रमात लावण्या खानोरकर विद्यार्थीनीचा दखल : " परंपरा जपणारे कुर्झा " लेख प्रकाशित.

जि.प.चंद्रपूर उक्रमात लावण्या खानोरकर विद्यार्थीनीचा दखल : " परंपरा जपणारे कुर्झा " लेख प्रकाशित.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१२/११/२५ ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत कुर्झा वार्ड, ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुर्झा शाळेतील वर्ग चवथे वर्गातील मागील सत्र २०२३-२४ ची विद्यार्थिनी कु.लावण्या भास्कर खानोरकर हिने चंद्रपूर जिल्हा परिषद " माझा गाव माझा इतिहास " उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.सदर विद्यार्थिंनीने आपल्या गावावर 'परंपरा जपणारे कुर्झा ' हा लेख लिहला.


या लेखाची दखल जिल्हा उपक्रमात घेण्यात आली असून सदर लेख चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत निघणा-या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला आहे. याबद्दल शाळेतील शिक्षक हरिदास गोंगले सर,वंजारी सर व शाळा समिती,डॉ.धनराज खानोरकर, वार्डातील नागरिकांनी तिचे अभिनंदन केले आहे.


या सत्रात कु.लावण्या भास्कर खानोरकर ही ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी कन्या शाळेत वर्ग ५ व्या वर्गात शिकत असून तिच्या या यशाचे कौतुकही मुख्याध्यापक बनपुरकर मॅडम व इतर शिक्षकांनीही केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !