ब्रम्हपूरीतील आर.डब्लू.अकॅडमीच्या १० विद्यार्थ्यांची इंडियन आर्मी मध्ये निवड.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरीतील आर.डब्लू.अकॅडमी विविध स्पर्धा परीक्षेचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत असते.या अकॅडमी मधून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करीत आहेत.आर.डब्लू. अकॅडमीने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली असून याच शिकवणी वर्गातुन बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंडियन आर्मी अग्निवीर यासाठी परीक्षा दिली होती.
दिनांक,२१ नोव्हेंबर रोजी इंडियन आर्मी अग्निवीर परीक्षेचा निकाल आला.त्यामध्ये आर.डब्लू.अकॅडमीच्या १० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.१० विद्यार्थ्यांची इंडियन आर्मी अग्निवीर मध्ये निवड झाली.
यामध्ये प्रसाद अजबले, तेजस बगमारे, मयूर बोरकर, गिरीश मोटघरे साहिल मेश्राम, वैभव वसेकर,युसूफ चंडिकार, तन्मय जुवारे,शुभम,अनिकेत या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आपल्या यशाचे श्रेय RW अकॅडमी चे संचालक होमराज लोनबले यांना दिले आहे.एकाच कोचिंग सेंटर मधून १० विद्यार्थ्यांची इंडियन आर्मी अग्निवीर मध्ये निवड झाल्याचा आनंद गगनात मावेसा झाला आपला आनंद व्यक्त करण्यात विद्यार्थ्यांनी कसलीही कसरत सोडली नाही.
कोचिंग सेंटरच्या सर्व विद्यार्थ्यानी फटाक्याची आतिषबाजी ढोल वाजवून जल्लोष रॅली काढली.सर्व स्तरातून या अकॅडमी चे व गुणवंत विद्यार्थी चे अभिनंदन केले जात आहे . विद्यार्थ्यांचे घवघवित यश म्हणजे बाकी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊनं परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांमध्ये सकारात्मक विचारांना वाव देण्याचे काम निश्चितच ठरेल अशी भावना RW अकॅडमीचे संचालक होमराज लोनबले यांनी व्यक्त केली .

