गडचिरोली येथील पथकाने पारडी नाक्यावर व्याहाड (बुज) इसमास पेट्रोल टाकीमध्ये छुप्या पद्धतीने तर S.T.बस मध्ये जॅकेट च्या अंदर दारू तस्करी करणाऱ्या रामनगर येथील महिलेला केली अटक. 📍एकुण 96,000/- रुपयांचा मुद्येमाल जप्त.

गडचिरोली येथील पथकाने पारडी नाक्यावर व्याहाड (बुज) इसमास पेट्रोल टाकीमध्ये छुप्या पद्धतीने तर S.T.बस मध्ये जॅकेट च्या अंदर दारू तस्करी करणाऱ्या रामनगर येथील महिलेला केली अटक.


📍एकुण 96,000/- रुपयांचा मुद्येमाल जप्त.


एस.के.24 तास


गडचिरोली : (दिनांक- 24/11/2025 सोमवार) गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जातो.त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणा­यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 23/11/2025 रोजी पोलीस स्टेशन,गडचिरोली येथील पथकाने पारडी नाका येथे अवैद्य दारूची वाहतुक करणा­या आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.


सविस्तर वृत असे आहे की, नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सुरु आचार संहिता कालावधीत पोलीस स्टेशन गडचिरोली हद्दीमध्ये सहा नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले आहेत.काल दिनांक 23/11/2025 रोजी पारडी नाका येथे पोलीस स्टेशन,गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार तैनाती दरम्यान वाहनांची पाहणी करत असताना गडचिरोलीकडे येत असलेल्या एका संशयीत दूचाकी वाहन चालकास थांबवून त्याची तपासणी केली.


दूचाकी वाहन चालक इसम नामे तानाजी नानाजी पेंदोरकर, वय.34 वर्षे रा.कुमार बस्ती,बीजेपी ऑफीस जवळ,बालानगर कुकरपल्ली,हैद्राबाद,तेलागणा,हल्ली मु.व्याहाड (बु.) तह. सावली,जि.चंद्रपूर हा आपल्या निळ्या रंगाच्या पल्सर दूचाकी वाहन क्र.MH.34 AX 9809 च्या पेट्रोल टाकीमध्ये छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारुची वाहतुक करीत असल्याचे आढळून आले. 


त्यानंतर दोन पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, सदर दूचाकी वाहनाच्या पेट्रोल टाकीमध्ये 1) 180 एम. एल मापाच्या रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की कंपनिच्या 40 नग सिलबंद बॉटल, प्रति बॉटल किंमत अंदाजे 400/- प्रमाणे एकूण 16,000/- रुपये, 2) अवैध दारु वाहतुक करीता वापरण्यात आलेली एक निळ्या रंगाची बजार कंपनीची पल्सर 150 दूचाकी वाहन क्र. एम. एच 34 ए. एक्स. 9809 जुनी वापरती अंदाजे किंमत 70,000/- रुपये असा एकुण 86,000/- (अक्षरी शहाऐंशी हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 1232/2025 कलम 65 (अ) म.दा.का. सहकलम 52 मोटार वाहन कायदा अन्वये 


आरोपी नामे 1) तानाजी नानाजी पेंदोरकर, वय 34 वर्षे रा. कुमार बस्ती, बीजेपी ऑफीसजवळ, बालानगर कुकरपल्ली, हैद्राबाद, तेलागणा,हल्ली मु.व्याहाड (बु.) तह.सावली जि. चंद्रपूर यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.


दिनांक 22/11/2025 रोजी पारडी नाका येथे पोलीस स्टेशन, गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार तैनातीस असताना चंद्रपूरहुन गडचिरोलीकडे येणा­या एस टी.बस मधील प्रवाशांची तपासणी केली असता,एक वयस्कर महिला गुलाबी रंगाचा स्टोल अंगावर पांघरुन घेऊन संशयीतरित्या बसलेली दिसून आल्याने सदर महिलेची तपासणी केली.


सदर महिला नामे ललीता सुधाकर महामंढरे,वय 65 वर्षे रा. रामपुरी, तह. आरमोरी जि.गडचिरोली, हल्ली मु.रामनगर वार्ड क्र. 19 तह. व जि. गडचिरोली ही आपल्या अंगात घातलेल्या जॅकेटमध्ये अवैधरित्या देशी दारु बाळगुन वाहतुक करत असल्याचे दिसून आले. सदर महिलेच्या जॅकेटची दोन पंचासमक्ष तपासणी केली.


जॅकेटमध्ये 1) रॉकेट संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या प्रत्येकी 90 एम. एल. मापाच्या 90 नग सिलबंद निपा, प्रत्येक निप किंमत 100/- रुपये प्रमाणे एकूण किंमत 9000/- रुपये, 2) लावा कंपनीचा ए 1 जोश लिहीलेला साधा मोबाईल फोन अंदाजे किंमत 1,000/- रुपये, असा एकूण 10,000/- रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 1225/2025 कलम 65 (अ), 83 म.दा.का.अन्वये आरोपी महिला नामे 


1) ललीता सुधाकर महामंढरे, वय 65 वर्षे रा. रामपुरी, तह. आरमोरी जि. गडचिरोली, हल्ली मु. रामनगर वार्ड क्र.19 तह.जि.गडचिरोली हिचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्रांचा पुढील तपास पोउपनि.शिवाजी देशमुख व मपोउपनि.पुजा नैताम करीत आहेत.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी.यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन,गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि.श्री. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !