जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या वादाला भाजपचा प्रतिवाद : “ कामशक्ती, संघटनशक्तीच आमची खरी ताकद. - प्रा.डॉ.किरण कापगते

जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या वादाला भाजपचा प्रतिवाद : “ कामशक्ती, संघटनशक्तीच आमची खरी ताकद. - प्रा.डॉ.किरण कापगते 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’ असा वाद सध्या चांगलाच तापलेला असताना आता भाजपने या आरोपांवर जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. काँग्रेसकडून प्रचारात “पैसा बोलतोय”, “ धनशक्तीचा वापर होतोय ” असे आरोप होत असताना भाजपने या वक्तव्यांवर आक्षेप नोंदवत त्याला “ जाणूनबुजून पेरलेला गैरसमज ” असे म्हटले आहे.


भाजपने प्रत्युत्तर देत सांगितले की,धनशक्तीचा आरोप हा निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेसची युक्ती आहे.भाजपकडे पैसा नाही,तर कामशक्ती, संघटनशक्ती आणि गेल्या पाच वर्षांत केलेली ठोस विकासकामे हा आमचा मुद्दा आहे.भाजपने असेही नमूद केले आहे की,विरोधकांकडे ठोस कामगिरी नसल्यामुळे,धनशक्तीचे चित्र निर्माण केले जात आहे.


धनशक्तीच्या आरोपांव्यतिरिक्त भाजपने काँग्रेसविषयी नव्या शंका उपस्थित केल्या आहेत.भाजपने म्हटले,विरोधी पक्षाचा, ठेकेदारीशी संबंध असल्याने निर्णयप्रक्रियेत हितसंबंधांचे संघर्ष निर्माण होऊ शकतात.एकता समर्थ नगराध्यक्ष झाल्या तर संपूर्ण व्यवहार, निविदा आणि प्रशासकीय निर्णय त्यांच्या पतींकडूनच चालवले जातील. त्यामुळे त्या फक्त ‘ रबर स्टॅम्प ’ बनण्याची शक्यता आहे.


“ किरण कापगते स्वतः सक्षम ”

भाजप उमेदवार प्रा.किरण कापगते या शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या, स्वतंत्र विचारसरणीच्या,प्रशासकीय समज असलेल्या आणि निर्णयक्षम उमेदवार आहेत.नगरपालिका चालवण्यासाठी जे तांत्रिक, कायदेशीर व आर्थिक कौशल्य आवश्यक आहे ते किरण कापगते यांच्याकडे आहे .त्यांना कोणत्याही व्यक्तीच्या छायेखाली काम करावे लागणार नाही.


त्यांच्यामध्ये स्वतंत्र नेतृत्व करण्याची क्षमता आहे.उलट एकता समर्थ हे संपुर्णपणे आपल्या प्रशांत समर्थ यांच्या निर्णयांवर अवलंबून राहील असा दिसते,आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपचे लक्ष शहर विकासाकडे लागलेले आहे.परंतु, विपक्षांचे लक्ष नुसतं लोकांमध्ये गैरसमज पसरवणे,हेच त्यांच्याकडे काम उरलेलं आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !