काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष नंदूभाऊ गुड्डेवार बंडखोरी करण्याच्या तयारीत नगरपरिषद निवडणूक २०२५.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१४/११/२५ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्याने वार्ड क्रमांक ११ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला फटका बसणार असून नंदूभाऊ गुड्डेवार हे बंडखोरी करणार आहेत.वेळ आल्यास ते स्वतंत्र स्वबळावर लढणार असल्याची चर्चा सध्या जोरात रंगत आहेत.
गेल्या २० वर्षापासून ते काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील विठ्ठलराव गुड्डेवार गुरुजी यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे संघटक म्हणून ३०-४० वर्ष कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात पक्षाला मोठी उभारी मिळाली होती. सध्या त्यांचे पुत्र नंदू भाऊ गुड्डेवार हे सामाजिक , राजकीय , अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तात्काळ पुरविणे व शैक्षणिक क्षेत्रात , गोरगरिबांची सेवा करण्याचे उल्लेखनीय कार्य करीत असतात.
ते पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा कार्य करीत आहेत.
वार्ड क्रमांक ११ मध्ये त्यांच्या प्रभागात त्यांचा मोठा दांडगा जनसंपर्क व वाढता प्रभाव असून शेकडो कार्यकर्त्यांकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.ब्रह्मपुरी - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांचे समर्थक व मतदारांमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे. वार्ड क्रमांक ११मधून त्यांना उमेदवारी नाकारल्यास ते काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे.
सोबतच नंदू गुड्डेवार हे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे चित्र दिसत आहेत.

