चित्रकला स्पर्धेत नवोदयच्या भूमिका तिरुपती चिट्याला ची राज्यस्तरावर झेप ; राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड.



चित्रकला स्पर्धेत नवोदयच्या भूमिका तिरुपती चिट्याला ची राज्यस्तरावर झेप ; राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड.


एस.के.24 तास


सिरोंचा : शासनाच्या सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत आयोजित " ऊर्जा संवर्धन " या विषयावरील चित्रकला स्पर्धेत पीएम श्री.जवाहर नवोदय विद्यालय घोटची विद्याऱ्थीनी भूमिका तिरुपती चिट्याला हिने उत्कृष्टी कलाकृती सादर करीत राज्यस्तरावर झेप घेतली आहे़ चित्रकला स्पर्धेत तिची राज्यस्तरावर निवड झाली असून अतिशय दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत तिने संपादित केलेले हे यश सिरोंचा तालुक्यासह जिल्ह्याचे नावलौकिक करणारे ठरले आहे़.


भूमिका तिरुपती चिट्याला ही जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या आदिवासीबहूल, अतिदुर्गम, अविकस अशा सिरोंचा तालुक्यातील व्येंकटापूर येथील रहिवासी आहे़ तिचे प्राथमिक शिक्षण व्यंकटापूर त्यानंतर सिरोंचा येथे झाले़ त्यानंतर अभ्यासातील सातत्य,दृढ निश्चय, आईवडीलांचे अमुल्य मार्गदर्शन या जोरावर तिने नवोदय परीक्षा उत्तीर्ण केल्याने तिची जिल्ह्यातील एकमेव घोट स्थित येथील नवोदय विद्याऱ्थ्याकरिता निवड झाली.


नियमित अभ्यास करीत असताना तिला चित्रकलेचीही आवड होती़ तिचे वडील तिरुपती चिट्याला यांनी तिला यासाठी सातत्याने प्रोत्साहित केले होते.दरम्यान शासनाच्या सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत आयोजित " ऊर्जा संवर्धन " या विषयावरील चित्रकला स्पर्धेत तिने पीएम श्री. जवाहर नवोदय विद्यालय घोटच्या वतीने प्रतिनिधीत्व केले होते.यात स्पर्धेत तिने उत्कृष्ट चित्रकलेचे सादरीकरण करीत राज्यस्तरावर आपली छाप सोडली आहे़ तिची राज्यस्तरावरील चित्रकला स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे़.

 

ऊर्जा संवर्धनासारख्या सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या विषयावर विद्यार्थिनींनी दाखवलेली सर्जनशीलता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असल्याचे मत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ममता लांजेवार,उप प्राचार्या राजन गजभिये यांनी व्यक्त केले. या विद्यार्थिनीची कलाशिक्षक अजय प्रकाश यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थिनींच्या या कामगिरीचे स्थानिक स्कूल कमिटी,शाळा व्यवस्थापन समिती तसेच व्यंकटापूरसह सिरोंचा तालुक्यातील नागरिकांकडून कौतूक केले जात आहे़.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !