सौ.नीता कोंतमवार स्मृतिप्रित्यर्थ कविसंमेलनाचे आयोजन : कविसंमेलनाध्यक्षपदी कवी डॉ.धनराज खानोरकर.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१८/११/२५ सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूरद्वारे आयोजित कवयित्री,लेखिका सौ.नीता कोंतमवार स्मृतिप्रित्यर्थ कविसंमेलनाचे आयोजन बल्लालपूर येथील कला,वाणिज्य महाविद्यालयात रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी ११.००वा. करण्यात आले आहे.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रसिद्ध कवी,लेखक,पत्रकार आणि ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, बहुचर्चित 'संजोरी' ग्रंथाचे लेखक डॉ.धनराज खानोरकर यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उद् घाटन सर्वसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अनिल शिंदे करणार आहेत.
यावेळी विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ रविंद्र केवट आणि प्रमुख अतिथी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ मनिषकुमार कायरकर, गडचिरोली जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा विनायक धानोरकर ,माजी नगरसेवक संजय वैद्य उपस्थित राहतील.
या कविसंमेलनाचे संचालन मंचाचे उपाध्यक्ष कवयित्री सीमा भसारकर करणार असून जवळपास साठ कवी आपल्या रचना सादर करणार आहेत.या कविसंमेलनाला जास्तीत जास्त कविंनी आणि रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंचाचे अध्यक्ष कवी इरफान शेख,सचिव कवी प्रदीप देशमुख,कवयित्री गीता रायपूरे, गझलकार सुनिल बावणे व इतर सदस्यांनी केले आहे.


