कुरखेडा तालुक्यातील गोठणगांव येथे ग्राम महसुल अधिकारी,सुलोचना कन्नाके यांना ५०० रुपये लाच स्वीकारताना अटक.
एस.के.24 तास
कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यातील गोठणगांव ता.कुरखेडा येथील ग्राम महसुल अधिकारी सुलोचना विठ्ठलराव कन्नाके वय,३८ वर्ष यांना अँटी करप्शन ब्युरोने ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराने आपल्या नावावर असलेल्या वनपट्ट्याच्या शेतजमिनीचा ७/१२ ऑनलाईन करण्यासाठी ग्राम महसुल कार्यालयात अर्ज केला. अर्जावर काम करत असताना,ग्राम महसुल अधिकारी सुलोचना कन्नाके यांनी ५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदारला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
२५ फेब्रुवारी २०२६ रोजी गोपनीय तपासाद्वारे पोलिस उपअधिक्षक विकांत सगणे यांच्या नेतृत्वाखाली शहानिशा केली गेली आणि २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कन्नाके यांनी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडली.

