माय मराठीचा सन्मान आणि संवर्धन करा. - प्राचार्य डॉ.शेकोकर
📍मराठी भाषा गौरवदिन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,27/02/2026 शुक्रवार " आज बारा कोटी लोकं मराठी बोलतात.व्यक्त होण्यासाठी मातृभाषा कामात येते.मराठीतले समृद्ध साहित्य वाचा.कवी कुसुमाग्रज हे मानवतावादी कवी होते.त्यांच्या कवितां आजही मनपटलावर आहेत. त्यांची जयंती आहे.अनेक कवी,लेखकांनी आपल्या मातृभाषेची मान उंचावण्याचा प्रयत्न केला.आपणही माय मराठीचा सन्मान करुन तिचे संवर्धन करा." असे आवाहन प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकरांनी केले.
ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित 'मराठी भाषा गौरवदिन' कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.विचारपीठावर डॉ राजेंद्र डांगे,कवी व विभागप्रमुख डॉ.धनराज खानोरकर,डॉ मोहन कापगते,डॉ.युवराज मेश्राम,डॉ.पद्माकर वानखडे उपस्थित होते.यावेळी माय मराठीवर सर्वांनी भाष्य केले.
प्रास्ताविक भाषण विभागप्रमुख डॉ.धनराज खानोरकरांनी संचालन व आभार डॉ.पद्माकर वानखडेंनी केले.कार्यक्रमाला डॉ असलम शेख,डॉ सुनिल चौधरी,डॉ.मिलिंद पठाडे,डॉ.राजू आदे व बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

