जंगल सफारीत चार पत्रकारांना घडले अनेक प्राण्यांचे दर्शन.चार पत्रकार ठरले प्रथम मानकरी.

जंगल सफारीत चार पत्रकारांना घडले अनेक प्राण्यांचे दर्शन.चार पत्रकार ठरले प्रथम मानकरी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी वनविभाग वनपरिक्षेत्र सिंदेवाही, सिंडबोडी ,कच्चेपार , सिंदेवाही सफारी पर्यटन या जंगलात चक्क एक नवे तर अनेक प्राण्यांचे दर्शन आढळून आले.कच्चेपार सफारीवर आलेले प्राणी प्रेमी पत्रकार बधु प्रवीण मेश्राम,दत्तात्रय दलाल,रुपेश देशमुख,नंदू गुड्डेवार या चार पत्रकार पर्यटकांनी जंगली प्राणी व पक्षी कॅमेरामध्येच नव्हे तर आपल्या डोळ्यात सुद्धा कैद केल्याची घटना 17 डिसेंबर रोजी घडली.


ब्रह्मपुरीच्या चार पत्रकार अभ्यास दौऱ्या निमित्त सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार या ठिकाणी आले होते. त्यांनी हिवाळ्याच्या दिवसात वन्य प्राण्यांचे दर्शन व्हावे, म्हणून वन विभागाच्या जंगल सफारी मधून सिंदबोडी ,कच्चेपार, सिंदेवाही जंगल सफारी या परिसराची भ्रमंती केली. 


यावेळी हिवाळ्याच्या दिवसात वाढलेल्या गवतातून एक नव्हे तर अनेक प्राण्यांचे दर्शन त्यांना झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळुन प्राणी पाहण्याची ही पहिलीच संधी होती. यावेळी त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून अनेक प्राण्यांचे शूटिंग घेतले तसेच फोटो पण काढले.इतर वन्य प्राण्यांचे सुद्धा त्यांना दर्शन झाले.विशेष म्हणजे कच्चेपार जंगलात जंगल सफारीवर असतांना चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. जंगल सफारी मिळाल्यानंतर त्यांनी हा संपूर्ण प्रकार वन विभागाचे अधिकारी व इतरांना सांगितला. 


विविध प्रकारच्या वनस्पती, सागवान,अर्जून,मोह ,चारं आवळा,गराडी,कुडा आदी विविध स्वरुपाची विपुल वनस्पती उपलब्ध आहे तसेच याच परिसरात पट्टेदार वाघ, बिबट,अस्वल, रान गवा, रान म्हैस, काळविट,हरिण, कोल्हा, लांडगा इत्यादी वन्यप्राण्यांसह मोर, पांढरे बगळे, विविध प्रजातींचे पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र ठरले आहे.मात्र पर्यावरणाचे संरक्षण, वन्यप्राण्यांचे नैसर्गिक जीवन जोपासण्याकरिता व विविध पक्ष्यांचे निवासस्थान या कच्चेपार जंगल सफारीत आहे. - अंजली बोरावार - वनपरिक्षेत्र अधिकारी,सिंदेवाही 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !