गाडगे महाराज पुण्यतिथीन निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : - स्वच्छता, समाजसेवा व मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री.संत गाडगे महाराज स्मारक, ब्रह्मपुरी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात गाडगे महाराज स्मारक समिती,ब्रह्मपुरीचे संचालक डॉ.ललित उजाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गाडगे महाराजांच्या सामाजिक कार्याचा व विचारांचा गौरव केला.समाजातील अंधश्रद्धा, अस्वच्छता, विषमता व सामाजिक अन्याय दूर करून मानवतेचा संदेश देण्यासाठी गाडगे महाराजांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा यावेळी उल्लेख करण्यात आला.
“ देव माणसात आहे ” हा विचार कृतीतून समाजापुढे मांडणारे ते थोर संत आजही समाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला रविभाऊ मेश्राम (माजी पंचायत समिती सभापती), प्रा. सुयोग कुमार बाळबुदे,सामाजिक कार्यकर्ता अनुकूलभाऊ शेंडे
प्रा.नरेश रामटेके,भीम आर्मी तालुका महासचिव नागेश चांहादे,सचिन निशाने,अंकुश कुंनगाडकर, रक्षित रामटेके,मनोज धनवीज,मयूर चांहादे, सुनील साळवे तसेच विहार मेश्राम (विद्यार्थी मित्र व सामाजिक कार्यकर्ता, ब्रह्मपुरी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गाडगे महाराजांच्या विचारांची अंमलबजावणी करून समाजात समता व माणुसकी वृद्धिंगत करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,असा निष्कर्ष यावेळी काढण्यात आला.


