क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिवसानिमित्त पूर्व तयारीसाठी माजी आमदार बळीरामजी सिरस्कार यांची सभा संपन्न.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
३ जानेवारी २०२६ ला नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मुल येथे माजी आमदार बळीरामजी सिरस्कार यांचे मार्गदर्शनात श्रीमती संध्याताई गुरुनुले माजी जि. प. अध्यक्षा यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेत नायगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमास जाण्याचे बाबतीत रूपरेषा ठरविण्यात आली.
सदर सभेस रामभाऊ महाडोळे माजी जि.प.सदस्य,दिपक पा. वाढई माजी जिल्हाध्यक्ष समता परिषद,विजय लोणबले जिल्हाध्यक्ष समता परिषद, राजूभाऊ मांदाळे विदर्भ संघटक माळी महासंघ,अमोल गुरुनुले प्रवक्ते महा.प्रदेश माळी महासंघ,विक्रम गुरनुले, सौरभ वाढई,डॉ. लेनगुरे सर,श्रीमती उषाताई शेंडे माजी नगराध्यक्षा,राकेश ठाकरे जिल्हा प्रमुख माळी महासंघ
वर्षाताई लोणबले माजी पं.स.सदस्या,प्रवीण मोहुर्ले शहर प्रमुख भाजपा मूल,नागोसे सर,गुरनुले सर, चंद्रकांत चटारे, मीनलताई लेनगुरे सरपंच चिरोली,राकेश मोहुर्ले, नितीन गुरनुले, सुरज मांदाळे, रुपेश निकोडे,मंगेश मोहुर्ले, विजू गुरुनुले, सचिन गुरुनुले, बंडुभाऊ गुरुनुले, राजूभाऊ वाढई मारोडा
राजेंद्र वाढई कांतापेट उपेंद्र शेंडे,प्रेमदास शेंडे,रामभाऊ गुरुनुले,रामदास गुरुनुले, भाऊजी लेनगुरे, संदिप वाढई, यामीनाताई भेंडारे, मनोज ठाकरे, राकेश महाडोरे,चांगदेव कावळे इ.माळी समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन श्री. ओमदेव मोहुर्ले तालुका प्रमुख माळी महासंघ व तालुका समन्वयक समता परिषद यांनी केले.

