गडचिरोली ते गुरुवळा मार्गावरील जंगल परिसरात माजी सैनिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या पहाटे मॉर्निंग वॉक दरम्यान उघडकीस.

गडचिरोली ते गुरुवळा मार्गावरील जंगल परिसरात माजी सैनिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या पहाटे मॉर्निंग वॉक दरम्यान उघडकीस.


एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली ते गुरुवळा मार्गावरील जंगल परिसरात माजी सैनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.6 फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली.भास्कर गिरमा बांबोळे वय,44 वर्ष रा.वनश्री कॉलनी,गडचिरोली असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,भास्कर बांबोळे हे माजी सैनिकी होते. बुधवारी (दि.6 फेब्रुवारी) दुपार च्या सुमारास त्यांनी गडचिरोली शहरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर गडचिरोली - गुरुवळा रोड च्या बाजूला आपली दुचाकी उभी करून जंगलात प्रवेश केला आणि तेथे गळफास लावून आत्महत्या केली.


गुरुवारी पहाटे च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला उभी असलेली संशयास्पद दुचाकी दिसून आली.त्या दुचाकीवर “ Press ” असे स्पष्टपणे लिहिलेले असल्याने नागरिकांना संशय बळावला.त्यांनी तात्काळ परिसरात पाहणी केली असता जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून माजी सैनिकाच्या अकाली निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !