शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळावी यासाठी वीज महावितरण कार्यालय अधिकाऱ्यास निवेदन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यात मागील वर्षी शेतकऱ्यांना कृषी पंप चालविण्यासाठी वीज महावितरण कंपनीने बारा तास सतत विद्युत पुरवठा सुरू ठेवला होता.परंतु आज दोन-तीन महिन्यापासून कंपनीने विद्युत पुरवठा बारा तासा ऐवजी आठ तास केला त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून उन्हाळी धान पीक घेणे कमालीचे धोकादायक ठरण्याचे चित्र दिसत आहे .
त्यामुळे हळदा,बोडदा,कुडेसावली व गांगलवाडी परिसरातील लोकांनी कॉम्रेड कम्युनिस्ट पक्ष नेते विनोद झोडगे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली.तेव्हा कॉम्रेड कम्युनिस्ट पक्ष नेते विनोद झोडगे गांगलवाडी परिसरातील शेतकऱ्यांसह वीज महावितरण कंपनी कार्यालय ब्रह्मपुरी येथे जाऊन तेथील अधिकारी यांना शेतकऱ्यांना आठ तासा ऐवजी मागील वर्षी प्रमाणे बारा तास वीज देण्यासंबंधाने निवेदन दिले.
सतत पडलेल्या पावसामुळे, आलेल्या पुरामुळे पावसाळी धान पिकाचे उत्पन्न अल्प प्रमाणात झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना झालेच नाही त्यामुळे उन्हाळी धान पीक योग्य पद्धतीने पाण्याची अडचण न भासता घेता येईल यासाठी बारा तास वीज पुरवठा द्यावे असे यावेळी कॉम्रेड कम्युनिस्ट पक्ष नेते विनोद झोडगे व शेतकरी यांनी वीज महावितरण कंपनी अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन देताना सांगितले.
हळदा येथील नखाते डीपीला बारमाही रस्ता जाण्यासाठी नसल्यामुळे डीपी मध्ये तांत्रिक बिघाड आल्यास दुरुस्त करण्यासाठी बऱ्याच दिवसाचा कालावधी लागतो त्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड होते पिकाला पाणी न मिळाल्या मिळाल्यामुळे शेतातील पिके करपून त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो.
त्यामुळे सदर डीपी ही रोडला लागून लावावी असे त्यांनी या निवेदनात सांगितले.यावेळी ईश्वर ठाकरे, राजेंद्र झोडगे, मनोज हुलके, भक्त दास ठाकरे ,प्रतीक डांगे, दत्तू नागोसे, अमोल मानापुरे उपस्थित होते.

