दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये सौ.लता शिशुपाल शेंद्रे सन्मानित

दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये सौ.लता शिशुपाल शेंद्रे सन्मानित 


एस.के.24 तास


गडचिरोली : मुलीची पहिली शाळा असलेल्या भिडेवाडाकार आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान आयोजित दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२६ चा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महान कार्याचा प्रचार व प्रसार तसेच भारतीय सविधानाविषय व्यापक जनजागृती करण्याच्या उदात हेतुने देशात पहिल्यांदाच पुणे येथे गतवर्षी आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलची बीजे पेरण्यात आली.


त्या यशस्वी परंपरेला पुढे नेत २ जानेवारी २०२६ मध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुण्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात प्रभावी स्वरुपात पार पडला. पुणे येथील ए एस जोशी सभागृह २ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत हा चार दिवसीय भव्य दिव्य महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.


 समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती आणि संविधान मृत्याची सांगड घालणारा हा फुले फेस्टिवल सर्व स्तरातून विशेष चर्चेचा विषय ठरला.दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलच्या काव्य महोत्सवात फुले प्रेमी कवयित्री सौ लता शिशुपाल शेंद्रे यांनी प्रभावी संविधान या विषयावर कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांचे साहित्यिक योगदानाची दखल घेत फेस्टिव्हलचे आयोजक संविधान दुत भिडेवाडाकार विजय वडवेराव सर यांच्या हस्ते त्यांना आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले.


या फेस्टिव्हलचे विषेश आकर्षक म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पारंपारिक वेशभूषेत साकारलेले सादरीकरण, कवि कवीयत्री तसेच बाल, कलाकार, नाट्य, अभिनय, दांडपट्टा, तलवारबाजी आणि लाटी काठीचे प्रात्याक्षिक सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलला देश, विदेशातुन अनेक प्रतीनिधीनी हजेरी लावली होती. 


चार दिवस प्रत्येक सत्रात ३००ते ४०० प्रतिनीधी कवि, कवीयत्री बालकलाकार आणि रसिकांची उपस्थिती लाभली. सहभागी मान्यवरांना आकर्षण व दर्जेदार सन्मान चिन्ह, सहभाग प्रमाणपत्र तसेच अधीकृत अध्यक्षपदाचा सन्मान देण्यात आला. फेस्टिवलचा सामाजिक उद्देश, अधोरेखित करत आयोजकांच्या वतीने १००० भारतीय संविधान ग्रंथाचे वाटप करण्यात आले.


या सोबतच शालेय विद्यार्थ्यांसाठी संविधानमय शालेय पॅड वितरित करण्यात आले.फुलेप्रेमी कवयित्री सौ लता शिशुपाल शेंद्रे यांना माहेरची हिरवी साडी, सन्मान चिन्ह, संविधान पुस्तक, शालेय पॅड देऊन महिला सन्मानाचा विशेष संदेश देण्यात आला. आयोजक भिडेवाडाकार कवि, संविधान दुत श्री विजय वडवेराव सर यांनी आपली मनोगतात सांगितले.


की घरघरातुन फुले प्रेमी घडले पाहिजे आणि संविधानाचा जागर झाला पाहिजे. हाच या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचा खरा उद्देश आहे.समाजाला समता, बंधुता आणि न्यायाच्या मृत्याशी जोडणारा दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२६ हा विचार, कला आणि संविधान जागृतीचा प्रेरणादायी उत्सव ठरला.अशा भावना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजर करुन व्य़क्त केल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !