समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र व समता संघर्ष समाज विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण संस्था,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने,राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.
एस.के.24 तास
गडचिरोली : समता संघर्ष समाज विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण संस्था,गडचिरोली तथा समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता गडचिरोली येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. लक्ष्मणराव मोहुर्ले (सामाजिक कार्यकर्ता, गडचिरोली) होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रभाकर वासेकर (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक) उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मा. मायाताई मोहुर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. विजयजी देवताळे तर सह-उद्घाटक मा. किशोरजी नरुले होते.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्त्री-शिक्षणातील अमूल्य योगदानावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. समाजातील तळागाळातील घटकांसाठी शिक्षणाचे दार खुले करून समतेचा, न्यायाचा आणि मानवतेचा विचार रुजविण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास मान.पंडित मेश्राम,हेमंत मेश्राम,अरुण शेंडे, गोवर्धन,विनय बांबोळे,चोकोबा ढवळे,निराशा भोयर,नंदा मेश्राम,शबाना, अरशिया शेख,वृंदा कोपरे, संगीता दडमल,भावना चापले,सानिया खेडेकर,सविता गेडाम,जयश्री जांभुळकर,सुषमा आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततापूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. आयोजक संस्थांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.


