सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची ज्ञानज्योत चेतवली. - प्राचार्य डॉ.शेकोकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : स्त्री शिक्षणाच्या बाबतीत आणि एकंदरीत स्त्री सुधारणेच्या बाबत फुले दाम्पत्यांचे योगदान लाखमोलाचे आहे.समस्त स्त्रियांसाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंनी अपार कष्ट,हालअपेष्टा सहन केल्या.पुण्याच्या भिडे वाड्यात १८४८ त्यांनी मुलींची पहिली शाळा काढून इतिहास घडविला.
सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची ज्ञानज्योत चेतवली " असे विवेचन कार्य. प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकरांनी काढले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मार्गदर्शन करीत होते.
सर्वप्रथम डॉ रेखा मेश्राम व अधीक्षक संगीता ठाकरे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर प्राचार्य डॉ शेकोकर,डॉ.राजेंद्र डांगे,डॉ.असलम शेख,डॉ धनराज खानोरकर,डॉ.मोहन कापगते,रतन मेश्राम,डॉ.भास्कर लेनगुरे, डॉ.सुनिल चौधरी,डॉ.युवराज मेश्राम,प्रा बालाजी दमकोंडवार,डॉ किशोर नाकतोडे,डॉ योगेश ठावरी,डॉ पद्माकर वानखडे
डॉ.वर्षा चंदनशिवे,डॉ राजू आदे,डॉ कुलजित कौर गील,डॉ.हर्षा कानफाडे,डॉ वर्षा चापके, डॉ प्रतिभा कढव,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, डॉ मोहूर्ले, डॉ ज्योती दुपारे,प्रा कोमल ठोंबरे,रोशन डांगे,सुषमा राऊत,प्रज्ञा मेश्राम,बाळा महाजन, दत्तू भागडकर अनिल निनावे इ.मान्यवरांनी पुष्प वाहून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केले. यावेळी घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ युवराज मेश्रामांनी केले.यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ शर्मा, डॉ खानोरकर,प्रा धिरज आतला, प्रदीप रामटेकेंनी सहकार्य केले.

