11 गावांनी मिळून मौजे नागलवाडी येथे 1 जानेवारी 2026 रोजी " शौर्य " दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली.
एस.के.24 तास
वाशीम : वाशिम जिल्ह्यातील,कारंजा (लाड) तालुकामधील,पहिल्यांदाच मौजे नागलवाडी येथे,1 जानेवारी 2026 रोजी या दिवशी " शौर्य दिना " निमीत्त विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून विजयस्तंभाला 600 -700 भिम अनुयायां तर्फे मानवंदना देण्यात आली.
या मध्ये परिसरातील एकुण 11 गावांतील भिमअनुयायांचा समावेश होता.(धनज (बु), नागलवाडी, भिवरी,मेहा, हिंगणवाडी,राहटी, हिवरा (लाहे),भामदेवी,मुंगुटपूर,पिंप्री (मोडक) व काजना, इ. गावांचा समावेश होता.)कार्यक्रमामध्ये, मानवंदना देवून उपस्थितांना प्रमुख पाहुण्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
विशेष उपस्थिती,सौरभ गवई,विपुल सावळे, भुषण प्रघणे, सुव्रत मोहोड,सुधीर प्रघणे, सिद्धू सिरसाट, आकाश भडके, अमर इंगळे,मंगेश इंगळे,नागसेन तायडे, रोशन वानखडे,दिलीप राऊत,मनोहर चांदेकर,देवानंद खैरे,आदित्य,खुशाल यांच्या उपस्थितीत 'शौर्यदिना' निमीत्त, विजय स्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम पार पडला.



