३१ डिसेंबर व नववर्षाच्या स्वागताला व्यसनांना स्पष्ट नकार,देसाईगंजमध्ये ४०५ युवक - युवतींचा निर्व्यसन संकल्प.
एस.के.24 तास
देसाईगंज (वडसा) : ३१ डिसेंबर २०२५ रोजी जाणाऱ्या वर्षाला निरोप देत व नववर्षाच्या स्वागतासाठी व्यसन आणि दारूला स्पष्ट नाही म्हणत देसाईगंज शहरातील तब्बल ४०५ युवक व युवतींनी आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याचा संकल्प केला.मुक्तीपथ तालुका देसाईगंज व इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या कर्मशाळा क्रमांक एक येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन व दारूला नाही म्हणा या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक श्री. लेखाराम हुलके यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व सांगून युवकांना योग्य दिशा देणारे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच श्री. हेमंत मेश्राम यांनी व्यसन व दारूची सवय कशी लागते, ती कशी टाळावी याबाबत सविस्तर माहिती दिली.थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या स्वागतासाठी दारू व वाईट व्यसनांना नकार देण्याच्या उद्देशाने रॅली व मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या उमेदवारांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम संस्थेचे प्राचार्य श्री. सुरेश चौधरी व सी. एम. गरमळे (एन.एस.एस. मुख्य समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती माया जाधव,श्री.व्ही.वाय.नागमोती, श्री. जयंत काटकर,श्री.दामोधर अंबादे, श्री. आर. सी. निखाडे, श्री.राकेश भोयर, श्री.टी.यु.औ सोयाम कुमारी योगिता बरकले
कुमारी एम.सी.चौदंते,कुमारी क्षमा बोंद्रे, श्री.गजानन ठाकरे,श्री.सतीश मेश्राम,कुमारी अंजली सुंदरकर,सौ.हसीना नंदेश्वर,श्री.शंकर निकुरे,श्री.पी.आर सोनटक्के,श्री.राहुल जनबंधू,सम्राट सोनेकर तसेच उपस्थित कर्मचारी व एन.एस.एस.स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.


