आपल्या कलागुणांना संपन्न करणारा सोहळा म्हणजे वार्षिकोत्सव. - प्र- कुलगुरु डॉ श्रीराम कावळे.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रम्हपुरी : " विद्यार्थ्यांनी सतत प्रवाहित असलं पाहिजे.या स्पर्धेच्या युगात एकतरी चांगली कला आपल्या अंगी असली पाहिजे. ज्ञान- विज्ञानाच्या या युगात कलेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.आपल्यातल्या सुप्त कलांना संपन्न करण्यासाठी हा वार्षिकोत्सव सोहळा असतो,हे आपण लक्षात घ्यावेत." असे विवेचन गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ श्रीराम कावळेंनी केले.ते वार्षिकोत्सव निमित्ताने नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात उद्घाटक म्हणून बोलत होते.
विचारपीठावर नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताबाई भैया अध्यक्षस्थानी होत्या.प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठी भाषा विद्यापीठ रिध्दपूरचे अधिष्ठाता डॉ कोमल ठाकरे होते तर अतिथी म्हणून संस्थेचे सचिव अशोक भैया,नगराध्यक्ष योगेश मिसार तर प्रमुख उपस्थितीत...
कार्य.प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर,प्राचार्य डॉ एम एस वरभे,प्रा मेजर विनोद नरड,वार्षिकोत्सव प्रभारी डॉ भास्कर लेनगुरे,डॉ हर्षा कानफाडे,शिष्यवृत्ती पुरस्कार प्रभारी डॉ.अजित खाजगीवाले,कला शाखा प्रमुख डॉ.राजेंद्र डांगे, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. रेखा मेश्राम,अधिक्षक संगीता ठाकरे,विद्यार्थी संघ अध्यक्ष सौरभ तलमले,श्रध्दा म्हशाखेत्री, सचिव कार्तिक गुरनुले,हर्षिता शेंडे इ.मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पाहूण्यांचा सत्कार करण्यात आला.अशोक भैयांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात श्रीमती स्नेहलताबाई भैयांनी, वार्षिकोत्सव हा विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी व कला गुणांच्या विकासाची पर्वणी आहे,असे सांगून शुभेच्छा दिल्या. पाहूण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय कार्य.प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी केले.मुख्य कार्यक्रमाचे संचालन डॉ धनराज खानोरकर तर शिष्यवृत्ती वितरण सोहळयाचे संचालन प्रा.बालाजी दमकोंडवार,प्रा.आकाश मेश्रामांनी केले.आभार डॉ अजित खाजगीवालेंनी मानले.यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ असलम शेख,डॉ मोहन कापगते
डॉ.रतन मेश्राम,डॉ युवराज मेश्राम,डॉ किशोर नाकतोडे,डॉ सुनिल चौधरी,डॉ अरविंद मुंगोले,डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे,डॉ मिलिंद पठाडे,प्रा दलेश परशुरामकर, डॉ कुलजित शर्मा,डॉ दर्शना उराडे,प्रा आकाश मेश्राम,डॉ अभिमन्यू पवार,पर्यवेक्षक प्रा. आनंद भोयर व समिती सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

