श्रीकृष्ण मंदिर तडस लेआउट रघुजी नगर वर्धा मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबीर संपन्न.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी श्रीकृष्ण मंदिर येथे महानुभाव पंथातील साधुसंत भिक्षुक वासनिक यांना मोफत आयुर्वेदिक मेडिसिन तपासणी करून 150 साधुसंतांची सेवा करण्यात आली.प.पू.म.श्री. सेवतकर बाबा श्रीकृष्ण मंदिर येथील मुख्य मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
मोफत आयुर्वेदिक आरोग्य सेवा डॉ. विनोद विनायकराव देशमुख महानुभाव पंथ सेवक नाडीतज्ञ, आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर व आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी आपली सेवा प्रदान केली. सोबत सौ छाया विनोद देशमुख महानुभाव पंथ सेवक. कू.नंदिनी पाटभाजे नर्स श्री अनिल कराळे श्री.प्रमोद धवड mr वर्धा,श्री.साहिल काळे mr यवतमाळ यांनी खूप परिश्रम घेतले. त्यानंतर वर्धा यवतमाळ नागपूर अमरावती येथील आयुर्वेदिक मेडिसिन विक्रेते यांनी या कार्यक्रमाकरिता मोफत मेडिसिन दिली.
त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद मानले. तसेच श्रीकृष्ण मंदिराचे संस्थापक.प.पू.म.श्री.सेवत्कर बाबा यांनी डॉ विनोद देशमुख यांना शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला व त्यांना आशीर्वाद देऊन असेच तुमच्या हातून कार्य घडत राहो ही बाबांनि आशीर्वाद दिला तसेच तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
शेवटी डॉ विनोद देशमुख यांनी सर्वांचे आभार मानून व महानुभाव पंथातील साधुसंत भिक्षुक वासनिक यांची सेवा करण्याचा जो मला प्रभू चरणी आशीर्वाद दिला त्याबद्दल त्यांनी असेच माझ्या हातून कार्य होत राहो ही प्रभू चरणी प्रार्थना केली. व आभार प्रदर्शन करून सर्वांचे साधुसंतांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.


