श्याम नगर येथे श्री,श्री,राधाकृष्ण अखंड महानाम यज्ञ कार्यक्रमाचे भव्य शुभारंभ!.
नागरिकांनी श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे लाभ घ्यावा. - डॉ.प्रणय भाऊ खुणे प्रदेशअध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
दिनांक 4 जानेवारी 2026
चामोर्शी : घोट जवळील श्यामनगर येथे श्री, श्री,राधाकृष्ण अखंड महानाम यज्ञाचे दिनांक 1 जानेवारी 2026 पासून भव्य शुभारंभ करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे होत असलेल्या या कार्यक्रमास चामोर्शी तालुक्यातील हजारो कृष्ण भक्त नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने भेट देतात.
व येथे होत असलेल्या भागवत कथेचा लाभ घेऊन रसपान करीत असतात आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे यांनी सदिच्छा भेट दिली व आशीर्वाद प्राप्त केला व यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत डॉक्टर खुणे यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला व उपस्थिताना मार्गदर्शन करताना डॉ, प्रणय भाऊ खुणे यांनी सांगितले.
भागवत कथा हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा सार आहे प्रत्येकाने आपले जीवन मूल्य हिंदू रीती रिवाजा प्रमाणे आचरणात आणावे व आपल्या आयुष्यात त्यांनी जीवन जगत असताना भागवत कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे पुण्यक्रम, व आचरण नक्कीच करावे असे प्रतिपादन केले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानु भाऊ उपाध्ये ज्येष्ठ नेते
मानवाधिकार संघटना तालुका सचिव दिनेश मुजुमदार,कमेटी अध्यक्ष समीरण रॉय, पदाधिकारी दीपंकर हलदार भाजपा नेते निरंजन ढाली, इंद्रजीत राय, सजल विस्वास, संजित विस्वास, दिनेश सडक, अक्षय मंडल, महेश मंडल,प्रकाश रॉय,व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

