Sahayog Women’s Foundation (UDAAN – Dream Big Fly High)धानोरा शाखेमार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
एस.के.24 तास
धानोरा : दिनांक 03/01/2026 रोजी धानोरा शाखेमार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले वाचनालय, धानोरा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.“ स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी,तुझ्यामुळेच शिकते आहे.
आज प्रत्येक नारी, या प्रसंगी Sahayog Women’s Foundation (UDAAN – Dream Big Fly High) यांच्या वतीने वाचनालयास पोलीस भरती,रेल्वे भरती,स्पर्धा परीक्षा तसेच बँकिंग परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके प्रदान करण्यात आली. तसेच वाचनालयात नियमित येऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पुस्तक देण्यात आले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व मार्गदर्शनपर संदेश देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी तसेच सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
शिक्षण हाच खरा सामाजिक परिवर्तनाचा मार्ग आहे असे मत मान्यवारांनी व्यक्त केले.यावेळी उपस्थित कर्मचारी,BM शालिनी लांजेवार मॅडम,BDO लखन मडावी,BO अक्षय पद्मगीरवार,BO प्रतिमा मोहुर्ले,हेमलता सहारे (स्वयंसेविका) उपस्थित होते.

