" कावळ ऍम्ब्युलन्स " ची प्रतिकृती दाखवत काँग्रेसने केला जिल्ह्यातील आरोग्यवस्थेचा निषेध.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा दुर्गम व मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वतःकडे ठेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवले असले, तरी प्रत्यक्षात आजही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व पायाभूत सुविधा पूर्णतः विकसित झालेल्या नाहीत. याचा फटका सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी व आदिवासी नागरिकांना सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस अपुरे रस्ते व आरोग्य सुविधांच्या अभावामुळे दुर्घटना घडत असून नुकताच एका गरोदर मातेचा व तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण आहे.
तरीही राज्य शासन व प्रशासन याकडे गंभीरपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम व सुरळीत करावी, अतिदुर्गम भागांना जोडणारे रस्ते तयार करून वाहतूक व्यवस्था सुधारावी.
तसेच मृत गरोदर मातेच्या कुटुंबाला न्याय व योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी काँग्रेसची मागणी असून या मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार, दिनांक रोजी दुपारी 12 वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृवात धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनादरम्यान "कावळ ऍम्ब्युलन्स " ची प्रतिकृती दाखवत काँग्रेसने जिल्ह्यातील ढिसाळ आरोग्यवस्थेचा निषेध केला.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी नगराध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ मेश्राम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, काँग्रेस ज्येष्ठ नेते वासेकर, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम
चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक श्रीकांत देशमुख, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, पंचायत राज सेल अध्यक्ष माजी जि. प. सदस्य कविताताई भगत, रोजगार सेल कार्याध्यक्ष पुस्पलताताई कुमरे, अनिल कोठारे, राजेश ठाकूर, शंकरराव सालोडकर, हरबाजी मोरे, अब्दुल पंजवानी, भूपेश कोलते, विनोद लेनगुरे, उत्तम ठाकरे, दिवाकर निसार, दिलीप घोडाम, ढिवरू मेश्राम, योगेंद्र झंजाळ, संजय मेश्राम, श्रीनिवास ताडपलीवार
महादेव भोयर, दत्तात्रय खरवडे, रतन शेंडे, श्रीकांत काथोटे, कुलदीप इंदुरकर, अमित तलांडे, नदीम नाथांनी संजय गावडे, भैय्याजी कत्रोजवार, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, निकेश कामिडवार, कुणाल ताजने, कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, रिता गोवर्धन, पोर्णिमा भडके, शितल ठवरे, शेवंता हलामी, मीनाक्षी रामटेके, दिनेश सिडाम, जितेंद्र मनगटे, किशोर चापले, संगीता मेश्राम, सुधीर बांबोळे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी महिला यावेळी उपस्थित होते.




