विकास विद्यालय अ-हेरनवरगांव येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन संपन्न.
स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी पगाराच्या दहा टक्के निधी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राखीव. - रेवन कदम पोलीस उपनिरीक्षक
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथे पोलीस स्थापना वर्धापन दिन व रस्ता सुरक्षा अभियान निमित्याने पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी व विकास विद्यालय,अ-हेरनवरगांव यांच्या संयुक्त विद्यमानेआज दि,०६/०१/२६ला विकास विद्यालयाच्या पटांगणावरती विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षा व रस्ता सुरक्षा अभियान विषयीचे प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक रेवन कदम साहेब तसेच पोलीस हवालदार अरुण पिसे यांनी मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
पोलीस उपनिरीक्षक रेवन कदम यांनी स्वतः गरिबीच्या परिस्थितीतून आयपीएस कसा झालो याचे ज्वलंत उदाहरण देऊन स्वतःच्या पगारात तील दहा टक्के निधी हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी राखून ठेवल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले.तर मेजरअरुण पीसे यांनी अल्पवयात मुलींनी स्वतःला सांभाळावे वाम मार्गाचा अवलंब करू नये.
कोणी फुस लावून पळवुन नेण्याचा प्रयत्न केला तर लगेच पोलीस स्टेशनशी संपर्क साधावाअसे त्यांनी यावेळी कळकळीचे आवाहन मुलींना केले.या मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव सतीश ठेंगरे प्रमुख अतिथी मुख्याध्यापक धोटे सर मेश्राम,वकेकार,खरकाटे,व इतर शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ठेंगरे सर तर आभार मुख्याध्यापक धोटे सर यांनी उपस्थितांचे मानले.


