डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : भारताच्या इतिहासात शिक्षणातील समानता आणि स्त्रीमुक्तीच्या चळवळीला दिशा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सदस्या तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे उपस्थित होत्या.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.आर.पी.कांबळे लाभले. विचारमंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मनोज चांभारे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मार्गदर्शिका म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाच्या पाली विभागाच्या प्रमुख प्रा. माला खोब्रागडे यांची उपस्थिती लाभली.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. माला खोब्रागडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव व क्रांतिकारक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. 


अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा परीसासारखा प्रभाव पडला असून, पुढे सावित्रीबाईंनी ते कार्य अत्यंत कणखरपणे व निष्ठेने पुढे नेले, असे प्रतिपादन केले.

         

कार्यक्रमाचे संचालन प्रा. करुणा कोसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.स्मिता खोब्रागडे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !