शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा १२ वी विज्ञान निकालात दणदणीत यश ; ९६.८९% झेप.
एस.के.24 तास
गडचिरोली : दि.०२ मे २०२६ श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली यांनी इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आज जाहीर झालेल्या निकालात महाविद्यालयाने ९६.८९% इतका भव्य निकाल नोंदवत प्रथम येण्याची परंपरा कायम राखली आहे.
यावर्षी तन्मय कुमारशाहा किरंगे व तुषार राजेश ताकसांडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी ६०० पैकी ५३६ गुण (८९.३३%) मिळवत विद्यालयातून तसेच जिल्ह्यात विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर कु. पुर्वा वसंत काटे हिने ५१२ गुण (८५.३३%) मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.
कु.अस्मिता अनिल हुलके (५०५ गुण, ८४.१७%), कु. प्रियल राजू गराटे (४९६ गुण, ८२.६७%), विनय जनार्धन पाल (४९४ गुण, ८२.३३%), कु. गुंजन कैलास अलोने (४८३ गुण, ८०.५०%), कु. धनश्री लोमेश मेश्राम (४७१ गुण, ७८.५०%), ओमकार चंद्रशेखर बारसागडे (४६९ गुण, ७८.१७%) व कु. कांचन यशवंत मेश्राम (४६२ गुण, ७७.००%) यांनीही उत्तम यश संपादन केले.
विद्यालयातील एकूण ३२२ विद्यार्थ्यांपैकी ३१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी १३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, ५२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर १६५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवले आहे.
या यशामागे विद्यालयाचे प्राचार्य मा. अरुण मुनघाटे यांचे कुशल नेतृत्व तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोलीचे अध्यक्ष मा. अनिल पाटील म्हशाखेत्री व मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

