ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील डाॅ.प्राध्या.रोमन जनबंधूला जागतिक युरोपियन संघ इंग्रजी भाषा कौशल्याचे जागतिक प्रमाणपत्र प्राप्त.
📍५०० पैकी ४४५ गुणाने प्रतिष्ठीत युरोपियन यादीत मानाचे स्थान.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील काळ्या मातीच्या कुशीत एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉ. प्राध्या.रोमन मोतीराम जनबंधू याने ब्रिटिश कौन्सिल युनायटेड किंगडम सांस्कृतिक व शैक्षणिक या संस्थेने आयोजित जागतिक युरोपियन इंग्रजी भाषेच्या सामान्य स्पर्धेत ५०० पैकी ४४५ गुण प्राप्त करून इंग्रजी भाषा कौशल्याचे जागतिक स्तरावरील मान्यता प्राप्त प्रमाणपत्र प्राप्त करून CEFR B2 CORE SKILजागतिक युरोपियन देशाच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या यादीत अ-हेरनवरगांव व भारताचे नाव लिहून गौरव, सन्मान प्राप्त केला.
सध्या ते प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेज,नागपुर येथे कार्यरत असुन प्राथमिक शिक्षणापासून इंग्रजी भाषेवर त्यांची घट्ट पकड होती.ब्रिटिश कौन्सिल युनायटेड किंगडम या संस्थेचे जाळे जगात १००पेक्षा जास्त देशात पसरलेले आहे.त्यांनी जागतिक जागतिक युरोपियन देशाच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या यादीत स्थान प्राप्त केल्याबद्दल त्यांचे व आई माधुरी वडील मोतीराम यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात येत असून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

