ब्रम्हपुरी- उमरखेड बससेवा पूर्ववत सुरु करा प्रवाशी सेवा असोशियशन ची मागणी.
आंदोलनाचा इशारा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी - २५/०३०/२६ ब्रम्हपुरी - उमरखेड,पुसद,दारव्हा,वणी,यवतमाळ या मार्गाने प्रवास करण्यासाठी ब्रम्हपुरी आगाराची एकही बस नसल्यामुळे ब्रम्हपुरी पासून सदर मार्गाने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी प्रवाशी नागरिक महिला व्यापारी यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.
प्रवश्यांची होणारी अडचण लक्षात घेता प्रवाशी सेवा असोशियशन शाखा ब्रम्हपुरीचे अध्यक्ष तथा समाजिक कार्यकर्ता प्रशांत डांगे यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन ब्रम्हपुरी उमरखेड बस्सेवा सुरु करण्याची मागणी केली होती.
त्यांच्या मागणीला यश येऊन मागील तीन चार वर्षांपासून ब्रम्हपुरी- उमरखेड बससेवा नियमित सुरु होती.प्रवश्यांचा प्रतिसाद मिळत असल्याने या मार्गाने ब्रम्हपुरी आगाराला भरपूर उत्पन्न मिळत होते.मात्र मागील पंधरा ते विस दिवसापासून ब्रम्हपुरी उमरखेड बस सेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे.
प्रवाशांना प्रवास करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ब्रम्हपुरी उमरखेड बससेवा पूर्ववत सुरु करा या मागणीचे निवेदन प्रवाशी सेवा असोशियशन शाखा ब्रम्हपुरीचे अध्यक्ष प्रशांत डांगे यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले यांना देण्यात निवेदन देण्यात आले.
निवेदनातून जर मागणी पूर्ण न झाल्यास प्रवाशी सेवा असोशियशन शाखा ब्रम्हपुरी तर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.निवेदन देताना प्रवाशी सेवा असोशियशन शाखा ब्रम्हपुरी चे राहुल भोयर,अमरदीप लोखंडे,शरद भानारकर,रमाकांत अरगेलवार् तसेच आदी सदस्य उयस्थित होते.

