आजपासून ब्रह्मपुरीच्या कुर्झा वार्डात तीन दिवसीय शिवजयंती उत्सव. शिवकीर्तन,व्याख्यान व एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण.

आजपासून ब्रह्मपुरीच्या कुर्झा वार्डात तीन दिवसीय शिवजयंती उत्सव.


शिवकीर्तन,व्याख्यान व एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,१७/०२/२६ येथील कुर्झा वार्डातील शिवाजी चौकात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भव्य तीनदिवसीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

    

बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं.७.००वा.विठ्ठल-रुक्मिणी वारकरी मंडळ मांगली ( चौ.) या संघाचा हरिपाठ आणि रात्रो ठिक ८.००वा. श्री क्षेत्र आळंदी येथील ह.रि.प.बाल कीर्तनकार माउली महाराज जाहूरकर यांच्या शिवकीर्तनाचे आयोजन केले आहे.यावेळी 'पुस्तकाचे घरा'तर्फे उत्कृष्ट वाचक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ सकाळी ८.०० वा. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आणि सांय.६.०० वा. ' रयतेचा राजा: शिवाजी माझा ' यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

    

या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी, लेखक, पत्रकार डॉ.धनराज खानोरकर असणार असून विषयावर वक्तृत्व स्पर्धेतील विजेते कु.समीक्षा पंडीत व अभय पांडे आपले विचार मांडणार आहेत.याप्रसंगी नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलासभाऊ विखार, नगरसेवक चंद्रकांत बावनकुळे,सुखदेव खेत्रे,माजी नगरसेवक सपना सुभाष खेत्रे उपस्थित असतील.


यानंतर वार्डातून शिवजयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ला सांय. ७.००वा. डॉ ज्योती दुपारेंचा' मी जिजाऊ बोलते ' हा एकपात्री प्रयोग रंगणार आहे.या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे,असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !