वाहतूक सुरक्षा,नियम,दुष्परिणाम व उपाय योजना या विषयावर पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी च्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन.

वाहतूक सुरक्षा,नियम,दुष्परिणाम व उपाय योजना या विषयावर पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी च्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,१७/०२/२६ ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगांव (भोसले) येथे पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी च्या वतीने पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बानबले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा, नियम दुष्परिणाम व उपाय योजना या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

निबंध स्पर्धेमध्ये विद्यालयाचे ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 स्पर्धेत 

१)प्रथम पारितोषिक- कुमारी उन्नती संदीप दोनाडकर वर्ग - ९ अ २) द्वितीय - कुमारी निधी प्रशांत कांबळे वर्ग - ५  

३ ) तृतीय - कुमारी अनुष्का विजय दोनाडकर वर्ग - ९ अ 

या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी च्या वतीने सन्मान चिन्ह देण्यात आले व त्यांचा सत्कार विद्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ओमप्रकाशजी बगमारे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून

  

पोलीस स्टेशन ब्रह्मपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे मॅडम,बिट अंमलदार अरुण पिसे, तसेच पोलीस हवालदार योगेश चौधरी होते . कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सहाय्यक शिक्षक रुपेश पुरी,विनोद महाले,सुरेंद्र मेश्राम, सचिन क-हाडे,ओंकार नाकाडे, दादाजी घ्यार, प्रेमचंद शेळके सर , गावडकर सर व राऊत मॅडम आणि तोडे मॅडम मोलाचे सहकार्य केले.


कार्यक्रमाला विद्यालयाचे जवळपास ३००विद्यार्थी - विद्यार्थिनी व गावकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र मेश्राम यांनी तर आभार पुरी सर यांनी व्यक्त केले .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !