वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर 25 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू.

वैगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर 25 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू.


एस.के.24 तास 


गडचिरोली : शहराजवळील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी सुमारे 2:00. वा.च्या सुमारास घडली.सुगत जगदीश खोब्रागडे वय,25 वर्ष रा.शिवणी ता.गडचिरोली असे मृतक तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार,सुगत हा गडचिरोली शहरातील गोकुळनगर परिसरात आपल्या आजीकडे राहत होता. 


सोमवारी त्याच्या मित्रांनी वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान अंघोळ करण्यासाठी तो नदीत उतरला असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. काही वेळानंतर ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

        

याच महिन्यात वैनगंगा नदीच्या वेगवेगळ्या ठिकाणी बुडून मृत्यूच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत एका महिलेचा, एका तरुण युवकाचा तसेच आरमोरी येथील एका तरुण अभियंत्याचाही बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे.


नदीपात्रातील पाण्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असतात.तरी नागरिकांनी नदीत उतरतांना विशेष काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अलीकडे नदीकिनारी पार्टी करण्याचे प्रमाण वाढल्याने अंघोळ व पाण्यात उतरण्याचे प्रकारही वाढलेले असून, सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्कता आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !