सौमेश्री जनबंधू ची नवोदय विद्यालयासाठी निवड.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव( भोसले) येथील विद्यार्थिनी कुमारी सौमेश्री मिथुन जनबंधू वर्ग 5 हि विद्यार्थिनी नवोदय पात्रता परीक्षा 2025 - 26 मध्ये 93.75 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली व तिची नवोदय विद्यालया करिता निवड झाली आहे.
विद्यालयाने दरवर्षी उत्तीर्ण होण्याची परंपरा कायम ठेवलेली असून तिच्या निवडीबद्दल विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे तथा वर्ग शिक्षक नाकाडे , पुरी , महाले , मेश्राम व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे विद्यालयात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या निवडी बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील व गुरुजन यांना दिले.

