छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवा. - डॉ.मोहन कापगते
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी - छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम सांगणे म्हणजे शिवजयंती नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिव विचार जणमाणसात, विद्यार्थ्यांमध्ये, बालमनात रुजने महत्वाचे आहे. शिवरायांचा रयतेकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांनी समजून घ्यावा, असे विचार डॉ. मोहन कापगते यांनी मांडले ते अ-हेरनवरगाव येथील शिवजयंती उत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिश ठेंगरे होते तर मुख्य मार्गदर्शक डॉ धनराज खानोरकर,डॉ रोमन जनबंधू,उद् घाटक योगेश राऊत माजी सरपंच तोरगाव,प्रमुख अतिथी म्हणून सुभाष ठेंगरे,मनोज ढवळे, रवी मेश्राम,वामन मिसार, गोन्नाडे मुख्याध्यापक,श्रीकांत पिलारे, प्रशांत राऊत,अमरदीप लोखंडे,नकटू ठवरे, नानाजी बगमारे, डाकराम दोनाडकर, ऋषी कुमार ठेंगरे , मेजर अरुण पिसे प्रशांत राऊत इ.मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवपूजनाने करण्यात आली.
याप्रसंगी डॉ खानोरकर म्हणाले की,शिवाजी लोकराजा होता. तो लोकांच्या भावना, दुःख जाणायचा म्हणून जाणता राजा आणि रयतेची नितांत काळजी घेणारा श्रीमंत योगी होता. धैर्य,साहस,पराक्रम शिवाजीकडून शिकण्यासारखे आहे. अध्यक्षीय मनोगतात सतीश ठेंगरे यांनी शिवजयंतीचे औचित्य सांगून ही परंपरा आपली आहे.शिवाजी तुम्हांला कळवा यासाठी हे प्रयोजन आहे,असे विचार मांडले. यावेळी जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवझाकी व नृत्यकरुन लक्ष वेधले.रात्रोला 'महाराष्ट्राची माउली ' हे शिवचरित्रावर नाटक पार पडले.
प्रास्ताविक संजय ढोरें यांनी तर संचालन अमरदीप लोखंडे व आभार वामन मिसारांनी मानले.यशस्वीतेसाठी शिवछत्रपती उत्सव समिती पदाधिकारी संजय ढोरें,राजेश ठेंगरे व समिती सदस्य गावकरी तरुण मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाप्रसंगी रोमन जनबंधू यांचा युरोपियन देशात प्रतिष्ठित नागरिक म्हणून नाव समाविष्ट झाल्याबद्दल आणि वंश राऊत याची सैनिक शाळा चंद्रपूर साठी निवड झाली म्हणून समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे शिवाजीचा पाळणा.कार्यक्रमाला परिसरातील जनतेने मोलाचे सहकार्य करून आयोजित करण्यात आलेल्या शिव भोजनासाठी ग्रामस्थांनी गर्दी करून शिव भोजनाचा आस्वाद घेतला.

