सुप्रसिद्ध संशोधन प्रयोगशाळांना भौतिकशास्त्र विभाग ने.हि. महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट.

सुप्रसिद्ध संशोधन प्रयोगशाळांना भौतिकशास्त्र विभाग ने.हि. महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट.


एस.के.24 तास 


ब्रम्हपुरी : भौतिकशास्त्र विभाग, नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथील विद्यार्थ्यांनी नागपूर येथील नावाजलेल्या विज्ञान संस्था इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, भौतिकशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ आणि विश्वेशरया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांना नुकतीच भेट दिली. या शैक्षणिक भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, विज्ञानाची आवड निर्माण करणे, विज्ञानाविषयी कुतुहल निर्माण करणे असा होता. 


या शैक्षणिक भेटीमध्ये जवळपास ५० भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या वैज्ञानिक भेटीदरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स मध्ये प्रा. सुभाशिष चंद्रा यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष गुन्हेगारी जगतात होणाऱ्या वैज्ञानिक तपासा संबंधी होणाऱ्या उपकरणाबाबत सखोल माहिती घेतली. विज्ञान संस्था नागपूर येथे नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सि. व्ही. रमण यांनी वापरलेल्या उपकरणांची इथंभूत माहिती प्रा.राजू बेलेकर यांच्या मार्गदर्शनात घेतली. 


भौतिकशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे विभागप्रमुख तथा सुप्रसिद्ध वैज्ञानिक डाॅ. संजय ढोबळे यांच्या मार्गदर्शनात वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये होणारे विविध प्रयोग आणि त्यांचा संशोधनातील आमुलाग्र उपयोग याबाबत यथोचित माहिती विद्यार्थ्यांना डॉ. स्मिता आचार्य मॅडम यांच्या मार्फत करून देण्यात आली तसेच विश्वेशरया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये वैज्ञानिक डॉ. रुपेश गेडाम यांनी 'सुपरकडंक्टर' चे प्रत्यक्ष कार्य विश्लेषित करून सांगितले.


 व विविध स्वयंपूर्ण वैज्ञानिक उपकरणांची यथोचित माहिती दिली. या विविधांगी वैज्ञानिक शैक्षणिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ने. हि. शिक्षण संस्थेचे सचिव श्रीमान अशोक भैया, पदाधिकारी आणि प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर यांनी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !