लांझेडा फर्निचर च्या वादातून झालेल्या खुनातील आरोपी ला पळून जाण्यास मदत करणाऱ्या भावाला अटक ; सात दिवसांची पोलिस कोठडी.

लांझेडा फर्निचर च्या वादातून झालेल्या खुनातील आरोपी ला पळून जाण्यास मदत करणाऱ्या भावाला अटक ; सात दिवसांची पोलिस कोठडी.


एस.के.24 तास 


गडचिरोली : फर्निचर बनविण्याच्या व्यवहारातून झालेल्या वादात ग्राहकाचा धारदार शस्त्राने खून केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवून त्याच्या भावालाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 18 मार्च रोजी 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सचिन रामचंद्र कोलूरवार वय,35 वर्ष रा.विवेकानंदनगर, गडचिरोली यांनी स्वतःचे तसेच गडचिरोलीहून पुणे येथे बदली होऊन गेलेले पोलिस निरीक्षक किरण देशमुख यांचे फर्निचर बनविण्याचे काम महेश महादेव बुरांडे वय,34 वर्ष रा.लांझेडा वॉर्ड,गडचिरोली) याला दिले होते. 


16 मार्च रोजी फर्निचर तयार नसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन महेश बुरांडे याने धारदार शस्त्राने वार केल्याने सचिन कोलूरवार यांचा मृत्यू झाला होता.


घटनेनंतर आरोपी महेश बुरांडे याला पोलिसांत हजर करण्याऐवजी त्याचा भाऊ प्रमोद महादेव बुरांडे याने त्याला दुचाकी वरून चामोर्शी तालुक्यातील तांबाशी येथे नेले.त्यानंतर दोघे चंद्रपूर येथे गेले होते.वकिलाचा सल्ला घेण्यासाठी जाण्यापूर्वीच चंद्रपूर बसस्थानक परिसरातून गडचिरोली पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.


मुख्य आरोपीला पलायनास मदत केल्याचा ठपका ठेवून प्रमोद बुरांडे याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 238 व 249 अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.दोन्ही आरोपींना 18 मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !