जाफ्राबाद ग्रामपंचायत वार्ड क्रमांक १ मधील विविध समस्यांची पाहणी. - कॉ.रवि बारसागंडी यांचा प्रशासनाला इशारा.

रवि बारसागंडी यांनी जप्राबाद ग्रामपंचायत वार्ड क्रमांक १ भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतांना.


जाफ्राबाद ग्रामपंचायत वार्ड क्रमांक १ मधील विविध समस्यांची पाहणी. - कॉ.रवि बारसागंडी यांचा प्रशासनाला इशारा.


एस.के.24 तास 


सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत जप्राबाद अंतर्गत वार्ड क्रमांक १ मध्ये अनेक मूलभूत समस्या गंभीर स्वरूपात समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाकपाचे सिरोंचा तालुका सचिव कॉ. रवि बारसागंडी यांनी संबंधित भागाला भेट देत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या.


या भेटी दरम्यान स्थानिक नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई, रस्त्यांची दयनीय अवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.अनेक ठिकाणी रस्ते अत्यंत खराब असल्यामुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले.


कॉ.रवि बारसागंडी यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि लवकरच या सर्व समस्या प्रशासनाकडे अधिकृतरीत्या मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.


यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले की, लाल झेंडा सदैव जनतेच्या हक्कासाठी आणि हितासाठी लढत आला आहे आणि पुढेही लढत राहणार आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर भाकपा कधीही तडजोड करणार नाही.तसेच, प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही किंवा दुर्लक्ष केले, तर जनतेचा व्यापक जनआंदोलन उभारून या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी संघर्ष तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.


“ ही सर्व मूलभूत समस्या आहेत.जर या समस्या सुटल्या नाहीत,तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री खुद मुख्यमंत्री असताना देखील जनतेला सुविधा मिळत नसतील,तर त्याचा काय उपयोग ? ” -  कॉ.रवि बारसागंडी तालुका सचिव सिरोंचा 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !