संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा - गडचिरोली तर्फे " मानव एकता दिवस ” चे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा - गडचिरोली तर्फे दिनांक,२६ एप्रिल २०२६ रोज रवीवारला जिल्हा महिला ररुग्णालय गडचिरोली येथे “मानव एकता दिवस” चे औचित्य साधून “ भव्य रक्तदान शिबिराचे ” यशस्वी आयोजन करण्यात आले.या शिबिरात निरंकारी मिशनच्या अनुयायांनी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एकूण ७५ रक्तदात्यांनी नाव नोंदणी केले.पुरुष ३६ व महिला १४ असे एकूण ५० रक्त दत्यांनी रक्तदान केली.श्री हरीशजी निरंकारी यांचे उद्घाटनाने नंतर रक्तदानास सुरूवात करण्यात आली.या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला.
श्रीमती डॉ.माधुरी किलनाके वैद्यकीय अधीक्षक जिल्हा महिला रुग्णालय गडचिरोली.श्री.हरीशजी निरंकारी: क्षेत्रीय संचालक,गडचिरोली, श्री.गोविंदजी सारडा ज्येष्ठ नेते बीजेपी गडचिरोली,श्री.गजानन तुंकलवार ब्रांच मुखी, गडचिरोली,श्री.धंजेकर साहेब हे होते.या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.श्रीमती छायाताई उईके अति.जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांनी भेट देऊन उत्साह वाढविला.
रक्तदान - एक उदात्त सेवा निरंकारी बाबा हरदेव सिंग जी महाराज यांच्या " रक्त नाडियो मे बहना चाहिये,नालियों मी नही " हा महान संदेश डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.गडचिरोली परिसरातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले.
रक्ताची प्रत्येक बाटली गरजूंचे प्राण वाचवण्यासाठी उपयुक्त ठरेल, या भावनेतून कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.शिबिराचे यशस्वितेकरिता सर्व निरंकारी सेवादल व रक्त संकलन चे सर्व अधिकारी कर्मचारी या मान्यवरांनी सहकार्य केले.



