विद्यापीठातील हे २८ मेरिट विद्यार्थी आमचे २८ अलंकार. - अशोक भैया पदवीदान समारंभ.

विद्यापीठातील हे २८ मेरिट विद्यार्थी आमचे २८ अलंकार. - अशोक भैया पदवीदान समारंभ. 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : सत्र २४-२५ मधिल गोंडवाना विद्यापीठीय परीक्षेत आपल्या नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांनी मेरिट यादित येऊन महाविद्यालयाचा मान उंचावला.हे विद्यार्थी जीवनात खूप मोठे होतील.हे २८ विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचे २८ अलंकार आहेत,असे मार्मिक भाष्य नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैयांनी केले.ते येथील पदवीदान समारंभात बोलत होते.

   

विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर, डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम,प्रा विनोद नरड, डॉ राजू आदे उपस्थित होते.यावेळी मेरिट विद्यार्थ्यांना पदवीदान करुन त्यांचा गौरव करण्यात आला.


यावर डॉ खानोरकर व प्राचार्य डॉ शेकोकरांनी भाष्य केले.प्रास्ताविक आयोजक डॉ.आदे,संचालन डॉ प्रकाश वट्टी तर आभार प्रा निलिमा रंगारींनी मानले.कार्यक्रमाला समस्त प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !