कलावंतांना झाडीपट्टी भुषण सन्मानपत्रांनी सन्मानित.

कलावंतांना झाडीपट्टी भुषण सन्मानपत्रांनी सन्मानित.


एस.के.24 तास 


आरमोरी : मौजा - अंगारा येथील सार्वजनिक नाट्य कला मंडळ, अंगारा यांच्या वतीने नाट्यनरेश रंगभूमी, वडसा/ब्रम्हपूरी निर्मीत, प्रकाश प्रधान लिखीत / दिग्दर्शीत हा खेळ संसाराचा या नाटकाच्या उद्घाटना प्रसंगी मान्यवर व प्रतिष्ठीत पाहुणे यांच्या उपस्थितीत नाट्यनरेश रंगभूमी, वडसा / ब्रम्हपूरी चे रौप्य महोत्सव (वर्ष २५ वे) औचित्य साधून झाडीपट्टी नाट्यनरेश रंगभूमी च्या माध्यमातून कला,समता, बंधुता व राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी जागृत प्रहरी म्हणून सदैव कार्यरत रहावे. 


आपणातर्फे समाज प्रबोधन कार्यान्वित व्हावा हिच अपेक्षा व सदिच्छा. त्यांच्या कला उपासनांची अभिरूची नाट्यक्षेत्रात आपले अमुल्य वास्तविक आहे. सर्व बाबीचा विचार करून नाट्यनरेश रंगभूमीच्या वतीने कलावंतांना झाडीपट्टी भुषण सन्मानपत्रांनी सन्मानित करण्यात आले.


अध्यक्ष - मा.श्री. नंदुभाऊ नरोटे सरसेनापती आदिवासी विद्यार्थी संघ नागपूर, उद्घाटक-मा. सौ. रेखाताई कोकाडे सरपंच ग्रा. पं. अंगारा, सह उद्घाटक- मा. श्री. श्रीरामभाऊ दुगा माजी उपसभापती पं.स. कुरखेडा, मा.श्री.संग्रामे सर धनंजय स्मृती विद्यालय अंगारा, मा. सौ. गिताताई कुंभरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कलावंतांना झाडीपट्टी भुषण सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन


श्री.अभिषेक प्रधान, प्रविण रामटेके, श्रीराम नखाते, संगिता भसारकर, सुप्रिया ढोरे, वैशाली ढोले, शिला सहारे, भाष्कर मेश्राम, नरेंद्र रामटेके, मनोज भेंडारे, अशोक नाकाडे, सचिन नागापूरे, आशिष पुणेकर, रूपेश बावणे, प्रशांत ढोंगे, बाल कलावंत प्रणित रामटेके व इतर कलाकारांना सन्मानित करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !