ब्रह्मपुरी झाडीबोली शाखेतर्फे महाराष्ट्रभर अनोखा बोलीजागर उपक्रम : 'नव्वद दिवस नव्वद विषय' घेऊन बोली संवर्धन
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : येथील झाडीबोली साहित्य मंडळातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात विविध बोलीचे संवर्धन व जतन व्हावे या उद्देशाने ब्रह्मपुरी झाडीबोली शाखेने महाराष्ट्रातील झाडीबोली, व-हाडी,नागपूरी,खानदेशी,कोकणी,मालवणी अशा विविध बोलीमध्ये ' नव्वद दिवस: नव्वद विषय ' घेऊन अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौखिक स्वरुपात मोठया प्रमाणात बोली साहित्य आहे.त्याचे संकलन करणे,हाही हेतू यामागे असून संपूर्ण बोलीजागर कार्यक्रम या शाखेने हाती घेतल्याचे शाखाप्रमुख कवी संतोष मेश्रामचे सांगणे आहे.
यासाठी ३३ वे झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,कवी, स्तंभलेखक व झाडीबोलीचे भाष्यकार डॉ धनराज खानोरकर,लेखक व कवी, झाडीबोली जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर,कवी व गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा विनायक धानोरकर,कवी मुरलीधर खोटेले हे यात सल्लागार असून कवी धनंजय पोटे,गडचिरोलीच्या किरण चौधरी,गायत्री गुरव, अमरावतीच्या वृषाली चोरे,योगिता निपाने,नाशिकचे अनिकेत सागर हे समूह प्रशासक म्हणून काम सांभाळत आहेत.
संपूर्ण बोलीमध्ये विविध विषय देऊन त्या,त्या बोली साहित्यिकांना लिहते करणे आणि बोलीच्या अभ्यासाला गती प्राप्त करुन देण्याकरिता हा उपक्रम ब्रह्मपुरी शाखेने हाती घेतला आहे.

