गडचिरोली शहरातील गोकुळनगर मध्ये हिट अँड रन : काळ्या जीपने कार, दुचाकी आणि सायकलींना दिला भीषण धक्का..!

गडचिरोली शहरातील गोकुळनगर मध्ये हिट अँड रन : काळ्या जीपने कार,दुचाकी आणि सायकलींना दिला भीषण धक्का..!


एस.के.24 तास 


गडचिरोली : शहरातील गोकुळनगर भागात ६ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास भरधाव काळ्या रंगाच्या जीपचालकाने उभ्या वाहनांना जोरदार धडक दिली. या हिट अँड रनमध्ये एका कारसह दोन दुचाकी आणि ५ सायकलींचे सुमारे ३७ हजार रुपयांचे नुकसान झाले. धर्मेंद्र दयाल रामटेके (५५) यांनी आपल्या घरासमोर कार (क्र. एमएच ३४ सीआर-६७९८) पार्क केली होती. 


शेजारील अभ्यासिकेबाहेर विद्यार्थ्यांच्या दोन दुचाकी आणि ५ सायकली उभ्या होत्या. काळ्या जीपने या सर्व वाहनांना चिरडत भीषण धडक दिली. धडकेचा आवाज ऐकून विद्यार्थी बाहेर आले असता, चालक चामोर्शी रोडच्या दिशेने सुसाट निघून गेला. या अपघातात रामटेके यांच्या कारचे बंपर व टायर फुटले, तर दोन दुचाकी आणि सायकलींचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे जीपच्या धडकेत सायकलचे चाकही क्षतिग्रस्त झाले होते.


पोलिस कारवाई आणि तपास सुरु 

या प्रकरणी गडचिरोली ठाण्यात अज्ञात जीपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस ताबडतोब आरोपीचा शोध घेत आहेत, असे पो.नि.विनोद चव्हाण यांनी सांगितले. परिसरातील मेडिकल स्टोअरच्या सीसीटीव्हीमध्ये काळ्या रंगाची जीप वेगाने जाताना कैद झाली आहे.या सीसीटीव्हीच्या आधारावर चालकाचा माग काढणे सुरू आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !