अ-हेरनवरगांव येथे श्रीमद्श्रीकृष्ण ज्ञानयज्ञ,ग्रामगीता तत्त्वज्ञान रहस्य हरिनाम सप्ताहाचा समारोप.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : हनुमान देवस्थान सेवा समिती, अ-हेरनवरगांव च्या वतीने हरिभक्त परायण केशर ताई मेश्राम व संच सानगडी यांच्या वाणीतून दिनांक २८ ते ०३/०४/२६ पर्यंत श्रीमद श्रीकृष्ण ज्ञानयज्ञ , ग्रामगीता तत्त्वज्ञान रहस्य हरिनाम भागवत सप्ताहाचे वाचन करण्यात आले.
हनुमान जयंतीचे औचित्य साधून दिनांक ०३/०४/२६ ला गोपाल काला व महाप्रसादाच्या कार्यक्रमा प्रित्यर्थ प्रमुख अतिथी म्हणून सतीशभाऊ वारजूरकर,मेजर अरुण पिसे,ग्राम महसूल अधिकारी संजय मटाले,अमरदीप लोखंडे, प्रशांत राऊत पत्रकार,वामन मिसार,धनंजय मेश्राम व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
प्रमुख अतिथींच्या हस्ते सुरेश आडकिने ,नंदुजी वैद्य ,वंदना देवतळे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.गोपाल काला झाल्यानंतर लगेच महाभोजन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील नागरिक ,तरुण वर्ग हनुमान देवस्थान समिती अध्यक्ष ब्रम्हदास सावजकर ,सचिव प्रभू कुथे, संयोजक हरिभाऊ बेदरे व इतर पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पाडला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्राध्या. मंगेश देवढगले यांनी पार पाडले.

