चामोर्शी - जामगिरी जवळ कार - ट्रक च्या भीषण धडकेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी ठार ; तीन जखमी..!

चामोर्शी - जामगिरी जवळ कार - ट्रक च्या भीषण धडकेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी ठार ; तीन जखमी..!


एस.के.24 तास 


चामोर्शी : आष्टी-चामोर्शी मार्गावरील जामगिरीजवळ बुधवारी (७ एप्रिल) दुपारी साडेतीन वाजता कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक विनोद कुमरे (५७) यांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. 


जखमी झालेल्यांमध्ये अमोल देशपांडे (४०), कुणाल मुळके (२८, रा. कोटगल, ता. गडचिरोली) आणि योगेश वरखडे (४८, रा. नागपूर) यांचा समावेश आहे. विनोद कुमरे हे या तिघांसह कार (एमएच ०२ बीआर-४९१९) ने आष्टीहून गडचिरोलीकडे परत होते, तर ट्रक (एमएच ३४ बीझेड-१३३७) चामोर्शीकडून आष्टीकडे जात होता. जामगिरीजवळ भरधाव ट्रकने कारला समोरासमोर धडक दिली. 


या भीषण अपघातात कुमरे गंभीर जखमी झाले, असता त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली. तर इतर तीन जखमींची प्रकृती स्थिर आहे. 


चामोर्शीचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी सांगितले की, ट्रकचालक ताब्यात असून, अपघाताबाबत सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, वाहनधारकांसाठी मार्गावर सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !