कमलापूर जंगलात भीषण आग ; शासकीय हत्ती कॅम्पसह वनसंपत्ती जळून खाक..!

कमलापूर जंगलात भीषण आग ; शासकीय हत्ती कॅम्पसह वनसंपत्ती जळून खाक..!


एस.के.24 तास 


अहेरी : तालुक्यातील कमलापूर येथील राज्यातील एकमेव हत्ती कॅम्पलगतच्या जंगलाला ६ एप्रिल रोजी आग लागली. यामुळे मौल्यवान वनस्पती व वनउपज मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. सिरोंचा वनविभागांतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील दामरंच्या मार्गालगत असलेल्या जंगल परिसरात लागलेल्या आगीने पाहता पाहता रौद्ररुप धारण केले.घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी तत्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

       

विशेष म्हणजे, या परिसरात शासकीय हत्ती कॅम्प असून सुमारे नऊ हत्ती येथे वास्तव्यास आहेत. अशा संवेदनशील ठिकाणी आग लागल्यामुळे स्थानिकांनी सवाल उपस्थित केला आहे, की याची जबाबदारी कोण घेणार ? स्थानिकांनी जंगलाला वणवे लागू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच, या आगीची चौकशी करून जबाबदारांचा शोध घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !