एस.के.24 तास
गडचिरोली : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गडचिरोलीचे नाव सातासमुद्रापार उंचावले आहे. गडचिरोलीचे सुपुत्र आणि नागपूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदकुमार तुळशीराम खंडारे यांची कन्या कु. आम्रपाली आनंदकुमार खंडारे हिने अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठातून " मास्टर्स इन मेक्याट्रॉनिक्स अँड रोबोटिक्स " ही मानाची पदवी संपादन करून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
शैक्षणिक प्रवास आणि यश : -
आम्रपालीचे प्राथमिक शिक्षण गडचिरोलीतील कारमेल हायस्कूलमध्ये झाले. तिने २०१५ मध्ये ९३.०१% गुणांसह सीबीएससी (CBSC) बोर्डातून एसएससी (SSC) परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर नागपूरच्या सेंट पॉल ज्युनिअर सायन्स कॉलेजमधून ८८% गुणांसह १२ वी (HSC) पूर्ण केली.
आपल्या ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेतून तिने JEE परीक्षेत यश मिळवून नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (VNIT) मधून ‘इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’मध्ये बी.टेक पदवी पूर्ण केली.
संघर्षातून गाठले शिखर : -
बी.टेक नंतर बंगळुरू येथील एका रोबोटिक्स कंपनीत नोकरी करत असतानाही तिने आपले पुढील शिक्षणाचे स्वप्न सोडले नाही. कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने GRE आणि टॉफेल (TOEFL) परीक्षेत ३४० पैकी ३१० गुण मिळवून उत्तम यश संपादन केले.
या यशाच्या बळावर तिची अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात निवड झाली. अखेर १८ मे २०२६ रोजी झालेल्या दीक्षांत सोहळ्यात आम्रपालीला 'मास्टर्स इन मेक्याट्रॉनिक्स अँड रोबोटिक्स प्रोग्राम' ही पदवी प्रदान करण्यात आली.
यशाचे श्रेय आई-वडिलांना : -
आपल्या या यशाबद्दल बोलताना आम्रपालीने याचे संपूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि समर्थनामुळेच मी हे ध्येय गाठू शकले, असे तिने नमूद केले.आम्रपाली च्या या उत्तुंग यशाबद्दल गडचिरोलीसह नागपूरमधूनही तिचे अभिनंदन होत आहे.

