चक्रीवादळात राजोली येथील टीनाचे शेड पडल्याने प्रशांत शेणमारे यांचा जागीच मृत्यू.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.३० च्या दरम्यान आलेल्या आकस्मिक तुफान चक्री वादळामुळे राजोली येथील प्रशांत डोनुजी शेणमारे वय (४५) यांचेवर नुकतेच बांधण्यात आलेला सिमेंट विटाचा शेड पडल्याने शेड खाली दबून प्रशांत शेणमारे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
घटनेचे सविस्तर वृत्त असे की, आज मंगळवार दिनांक,05/05/2026 रोजी दुपारी तीव्र ऊन असतांना अचानक तुफान चक्री वादळ व गारासह पाऊस आला. तुफान वादळ इतका जोरदार असल्याने राजोली येथील रहिवाशी प्रशांत शेणमारे यांनी राजोली रेल्वे स्टेशन जवळ आपल्या शेतात सिमेंटच्या विटांचा व्यवसाय सुरु केला असल्याने त्यासाठी शेड बांधकाम केला होता.
तुफान वादळ आला तेव्हा प्रशांत हा शेड खाली सहारा घेतला तेव्हाच अचानक चक्री तुफान वादळामुळे शेड प्रशांतच्या अंगावर पडल्याने तो तिथेच जागेवर शेडखाली दबून राहिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच मूल पोलिस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
मोका चौकशी व पंचनामा करुन मृतकाचे प्रेत शव विचेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे हलविण्यात आले.मृतक प्रशांत यांना पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.

