जाफराबाद येथे एअरटेल टॉवर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी.
एस.के.24 तास
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत जाफराबाद हद्दीत उभारण्यात आलेल्या एअरटेल मोबाईल टॉवर व सध्या सुरू असलेल्या नवीन खांबासाठीच्या खोदकामाबाबत चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कामासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, तसेच रस्ते व सार्वजनिक जागेची हानी झाली आहे का,याची सखोल चौकशी व्हावी.
जर नियमांचे उल्लंघन आढळले तर संबंधित कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.या प्रकरणात तहसील प्रशासन, ग्रामपंचायत व संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी व गावकऱ्यांचा विश्वास कायम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


