ब्रम्हपूरी तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी वामन मिसार यांची निवड.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : ब्रम्हपूरी तालुका शेतकरी सल्लागार समितीची पूनर्रचना करून तालुक्यात कृषी व कृषी संलग्नित उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.सदर समीतीच्या अध्यक्षपदी वामन मिसार यांची कृषी अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या उपस्थितीत एक मताने निवड करण्यात आली आहे.
तर सदस्य म्हणून विलास कचरू मेश्राम रणमोचन, केशव बालाजी भुते पिंपळगाव, श्रीहरी नारायण देवगडे चौगान ,संदीप केवळ बगमारे चांदली, वासुभाऊ श्रीराम सोंदरकर ब्रम्हपूरी, पराग अरविंद बनपुरकर ब्रम्हपुरी, अनमोल हरीजी राऊत लाखापूर, सुधिर घनश्याम पिलारे पारडगाव, किशोर शत्रुघ्न राऊत चोरटी, हरीदास मनोहर ठेंगरी सुरबोडी, अशोक कुसन भुते निलज, जयेश नानाजी राहटे गांगलवाडी,
सौ.मंगला मधुकर लोनबले चोरटी, सौ.भावना भावराव ईरपाते मेंडकी,सौ.मंगला दत्तात्रय टिकले पिंपळगाव, हरीश्चंद्र आत्माराम गेडाम एकारा, अण्णाजी नामदेव बगमारे जुगनाळा, सौ.वैशाली विजय नाकतोडे उदापुर, सौ.सुरेखा केवळ लळके धानोली, मालती मधूकर कुथे गांगलवाडी, सौ.ज्योती सचिन मेश्राम खेडमक्ता यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीबद्दल नवनियुक्त कार्यकारीणीचे विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रा.राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, नगराध्यक्ष योगेश मिसार, न.प.उपाध्यक्ष डॉ नितीन ऊराडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर यांनी अभिनंदन केले आहे.
काँग्रेस कार्यालयात नवनियुक्त ब्रह्मपुरी तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष वामन भाऊ मिसार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष खेमराज तिडके, बाळूभाऊ राऊत, वासूभाऊ सोदरकर, संदीप भाऊ बगमारे, राम मोहन ब्राडिया,अतुल राऊत, अकुल राऊत अ-हेरनवरगांव उपस्थित होते.

