गडचिरोली तालुक्यातील खुर्सा येथे जंगली डुकराच्या धडकेत तिन जण जखमी.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील खुर्सा येथे तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गावालगतच शेतशिवारात गेलेल्या नागरीकांवर जंगली डुकराने हल्ला करुन एक मुलगी व दोन पुरुष जखमी झाल्याची थरारक घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार खुर्सा (नवेगाव) येथे तेंदुपत्ता सिझन सुरू असल्यामुळे परीसरातील नागरीक तेंदुपत्ता संकलण करण्याकरीता गावाच्या आसपास परीसरात जात असतात.
अशातच आज दिनांक ३ मे रोजी गावातील नागरीक तेंदुपत्ता संकलण करण्याकरीता गेले असता जंगली डुकराने अचानक हल्ला चढवला त्यात
1) राजु एकनाथ मेश्राम वय,४० वर्ष
2) सावन पुरुषोत्तम चुधरी वय,२६ वर्ष
3) चंदा आबाजी कटाणे वय,१६ वर्ष
हे तिन जण जखमी झाले. घटनेची माहिती वनविभागाला कळताच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित झाले व जखमींना तात्काळ गडचीरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या जखमींची प्रकृती स्थिर असून, पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.

